
लग्न समारंभाचा हंगाम जवळ येऊ लागला आहे. लग्न ठरलेल्यांसाठी बारीक होणं हा एक महत् प्रयास असतो. अशावेळी छोट्या छोट्या बदलानेही तुम्ही वजन कमी करु शकता. याकरता तयारी मात्र किमान महिनाभर करा. म्हणजे लग्नात तुम्ही सर्वांमध्ये खुलून दिसाल. आंख खुले तब सवेरा या म्हणीला अनुसरून लग्नाला जे काही चार ते सहा आठवडे उरले असतील त्यांचा पुरेपूर उपयोग करून घ्या.

रोज सकाळी उठून सर्वप्रथम एक फळ किंवा एक मोठी वाटी पपई घ्यावी. तसेच लिंबू, मीठ ,चिमूटभर दालचिनी पूड घालून कोमट पाणी घ्यावे. ह्यामुळे शरीराला डिटॉक्सिफिकेशन आणि क्लेनझिंग व्हायला मदत होते.
व्यायामाला कमीत कमी १ ते २ तास रोज देणे जरुरीचे आहे. चालणे,पोहणे,सूर्यनमस्कार घालणे इ. प्रकार बारीक होण्यासाठी फार उपयोगी ठरतात.
व्यायामाप्रमाणेच पोषक अन्न देखील महत्वाचे असते. त्यामुळे योग्य प्रमाणात योग्य वेळी आणि योग्य कॉम्बिनेशनचे अन्नघटक शरीरात जाणे महत्वाचे आहे.
बारीक होण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे, डाएट करणे शरीराला घातक ठरू शकते. यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स किंवा नंतर अचानक खूप वाढलेले वजन असे दुष्परिणाम पाहायला मिळतात.

दर दोन तीन तासांनी एखादे फळ, ताक किंवा सूप किंवा अगदीच कामात असाल तर मल्टिग्रेन बिस्किट्स नक्की खा.
सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण यात सर्व पोषकतत्व जाणे गरजेचे आहे. त्यामुळे यावेळी चौरस आहार घ्या.ज्यात कार्बोहायड्रेट आणि फायबरसाठी धान्यापासून बनलेले काहीतरी जसे पोहे, रवा, भाकरी, चपाती,कॉर्नफ्लेक्स, व्हीटफ्लेक्स इ.
(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)