न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर मालिकेत टीम इंडियाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर बीसीसीआयने सर्वच खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे आदेश दिले. त्यानुसार टीम इंडियातील स्टार खेळाडू रणजी स्पर्धा खेळण्यासाठी उतरले. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सराव म्हणून हे खेळाडू मैदानात उतरले, पण जवळजवळ सर्वच खेळाडू फेल गेले. कर्णधार रोहित शर्मासह शुभमन गिल, ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर स्वस्तात बाद झाले.
रोहित कमबॅकमध्ये फेल
रोहित शर्मा तब्बल 10 वर्षांनी रणजी स्पर्धेत उतरला होता. मुंबई विरुद्ध जम्मू-कश्मीर सामन्यात रोहित सलामीला आला. मात्र तो अवघ्या 3 धावा काढून बाद झाला.
Rohit Sharma, what a SUPERSTAR !!
To take a pause & catch your breath requires courage … More power to you … Respect !! @ImRo45 pic.twitter.com/PTh5QDwC6q— riyansh ♡ (@Priyanxhx) January 23, 2025
यशस्वीही अयशस्वी
रोहितसोबत सलामीला आलेला डावखुरा खेळाडू यशस्वै जैस्वालही अयशस्वी ठरला. बाद होण्यापूर्वी यशस्वीने फक्त 4 धावा केल्या.
अय्यरही झटपट बाद
मुंबईकडून खेळणारा टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू श्रेयस अय्यरही झटपट बाद झाला. त्याने 11 धावांची खेळी केली.
पंतचे एका धावेवर पॅकअप
दिल्लीविरुद्ध सौराष्ट्र लढतीत ऋषभ पंतच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा होत्या. विस्फोटक खेळीसाठी ओळखला जाणारा पंत सौराष्ट्रविरुद्ध विशेष कामगिरी करू शकला नाही. अनकॅप्ड खेळआडू डीए जडेजाने पंतला एका धावेवर बाद केले.
गिलचेही धावांचे वांदे
रणजी स्पर्धेत पंजाबचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. मात्र कर्णधार पंतसह पंजाबचा संपूर्ण संघच फुसका बार ठरला. कर्नाटकने पंजाबचा अवघ्या 50 धावांमध्ये खुर्दा उडवला. यात गिलचे योगदान राहिले फक्त 4 धावांचे.
रोहित शर्माचं रणजीतील ‘कमबॅक’ फेल, पण यशस्वीसोबत रचला इतिहास; 17 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं