बीड पोलीस स्थानकात नवीन पलंग का मागवले? रोहित पवार यांचा सवाल

बीड पोलीस स्थानकात पाच नवीन पलंग मागवले आहेत. हे पलंग आताच का मागवण्यात आले आहेत असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे. तसेच ही तत्परता राज्यातील इतर पोलीस स्थानकांतही दाखवा आणि एसीची सोय करा असेही रोहित पवार म्हणाले.

एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत.
तसेच नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी शिवाय गादी-उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा असेही रोहित पवार म्हणाले.