
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज बीड जिल्ह्यातून गुंडांकडून सामान्यांना मारहाण होत असल्याचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. मात्र हे व्हिडीओ मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेतून लक्ष वळवण्यासाठी समोर येत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी हा आरोप केला आहे.
मनोज जरांगे म्हणाले आहेत की, “संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी सापडत नाहीय, इतर आरोपी सापडतात. म्हणजेच या प्रकरणात 100 टक्के भेदभाव केला जात आहे. बाकीच्यांना सूट दिली जात आहे. भ्रष्टाचाऱ्यांशी पार्टनरशिप करणारं हे सरकार आहे. त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटवायचं आहे, म्हणून एकमेकांच्या कार्यकर्त्यांचे व्हिडीओ काढले जात आहेत. याला राजकीय डाव म्हणावं लागेल.”