बीडच्या गुंड टोळीला राजकीय वरदहस्त, खासदार सोनवणेंचा आरोप

महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे वास्तव स्पष्ट झाले आहे. एक नंबरचा आरोपी गुंडांचा राजा किंवा गुंडांचा प्रमुख म्हणता येईल. त्याच्या टोळीत 11 जण असून, सुमारे 100 लोक त्याच्या प्रभावाखाली कार्यरत आहेत. तसेच,  या टोळीला राजकीय वरदहस्त आहे. राजकीय वरदहस्त पुणाचा हे सगळ्यांना माहिती आहे. मी त्याचे नाव घ्यायला घाबरत नाही. पण नाव घेतल्याने राजीनामा होणार आहे का? असा सवाल बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता उपस्थित केला.

बीडच्या मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात ईडीसुद्धा आली पाहिजे. हे प्रकरण इथेच थांबत नाही. अजून शेवटच्या टोकापर्यंत जायला पाहिजे. महाजन आणि पाटील या दोन पोलिस अधिकाऱ्यांना सह आरोपी केले पाहिजे. आरोपींना मदत करणाऱ्यांना, फरार आरोपींना अटक झाली पाहिजे, असे सोनावणे म्हणाले.