Breaking News : बीड हादरले! ईदआधी मशिदीत स्फोट; गावात तणाव

प्रतिकात्मक छायाचित्र

बीडमधील अर्धामसला गावातील मशिदीत स्फोट झाला आहे. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास हा स्फोट झाला. सुदैवाने या स्फोटामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मशिदीचे नुकसान झाले आहे. स्फोटामुळे मशिदीत सहा इंचाचा खड्डा पडला आहे

स्फोटानंतर तलवाडा पोलीस ठाण्याबाहेर मुस्लिम समाजाचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी अधिकचा फौजफाटा तैनात केला आहे. या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. हे दोन्ही तरुण 22 वर्षांचे आहेत.