नखांवर नेलपेंट लावताय तर सावधान! ‘हा’ घातक आजार होऊ शकतो

स्त्रियांना नटण्या सजण्याची फार हौस असते. त्यामुळे त्या नेहमीच शरिराची काळजी घेतात. लांब घनदाट केसांसाठी, स्वच्छ सुंदर चेहऱ्यासाठी अनेक कॉसमॅटिक्सचा दैनंदिन जीवनात वापर करतात. मात्र केस आणि चेहऱ्याप्रमाणेच नखांचीही काळजी घेतली पाहिजे. यासाठी बाजारात मॅनिक्युअर, पेडीक्योर अशा गोष्टी उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षांत नखांची निगा राखणाऱ्या उत्पादनांची मागणी वाढली आहे. बहुतेक मुली आपले हात सुंदर बनवण्यासाठी नखांना नेलपेंट लावतात.

बाजारात विविध रंगांचे नेलपॉलिश सहज उपलब्ध आहेत. स्त्रिया त्यांना खूप आवडीने लावतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की या नेल पेंटमुळे घातक आजार देखील होऊ शकतात. शरीराच्या अनेक भागांवर याचा घातक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. चला जाणून घेऊया नेल पेंट्स हानिकारक का असतात…

नेल पॉलिशचे दुष्परिणाम

1. नेलपॉलिशचा सतत वापर केल्याने नखांचा रंग खराब होतो.

2. जेल नेलपॉलिश सुकविण्यासाठी वापरण्यात येणारे दिवे यूवी किरण तयार करतात, ज्यामुळे त्वचेचा कर्करोग आणि अकाली वृद्धत्व होऊ शकते.

3. रासायनिक उत्पादनांनी नेलपॉलिश काढल्याने नखे खडबडीत होऊ शकतात. यामुळे नखांचा नैसर्गिक रंग खराब होऊ शकतो.

4. नेलपॉलिशमधील रसायने नखांमध्ये जाऊन अनेक समस्या निर्माण करू शकतात.

5. रासायनिक नेलपॉलिशमुळे श्वसनाचा त्रास होऊ शकतो.

6. नेलपॉलिशमुळे हृदयाचे धोकादायक आजारही होऊ शकतात.

7. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की रासायनिक नेलपॉलिशमुळे देखील कर्करोगाचा धोका असतो.

नेलपॉलिशचे धोके कसे टाळायचे

1. नेलपॉलिश जास्त वेळ लावू नका.

2. जेल किंवा पावडर डिप पॉलिश स्वतः काढू नका. मॅनिक्युरिस्टचा सल्ला घ्या.

3. नेलपॉलिश फक्त खास प्रसंगीच लावा. आपल्या नखांची वेळोवेळी काळजी घ्या.

5. कमी रसायने असलेले नेलपॉलिश वापरणे उत्तम राहील.