जुहू चौपाटीवर ‘बीच वॉकथॉन’

शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा व सद्भावना सेवा समिती मुंबई यांच्यावतीने जुहू चौपाटी येथे ‘बीच वॉकथॉन 2025’ स्पर्धेचे शनिवार, दि. 25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 6 वाजता आयोजन करण्यात आले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गेली 6 वर्षं बीच वॉकथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते, स्पर्धेचा शुभारंभ बिर्ला लेन येथे होतो तर बक्षीस वितरण बिर्ला लेन उद्यानात करण्यात येते. या स्पर्धेचे आयोजन विधानसभा समन्वयक सुनील जैन खाबिया यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे. जुहू चौपाटीवर नियमित येणारे स्थानिक नागरिक, योगा, एरोबिक, जॉगर्स, ज्येष्ठ नागरिकांचे सर्व ग्रुप मोठय़ा संख्येने सहभागी होतील. सर्व स्पर्धकांना मोफत टीशर्ट आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. शिवसेनाप्रमुखांचा हिंदुत्वाचा विचार जोपासण्यासाठी ‘वॉक फॉर हिंदुहृदयसम्राट’ अशी आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.