महामारीसाठी तयार रहा, काळजी वाढवणारा निती आयोगाचा अहवाल

चार वर्षांपूर्वी संपूर्ण जगात कोरोना नावाच्या महामारीने थैमान घातले होते. आता आणखी एका महामारीसाठी तयार रहा असे सांगणारा एक अहवाल निती आयोगाने प्रसिद्ध केला आहे. महामारीशी लढण्यासाठी एक खास समिती नेमावी असे या अहवालात म्हटले आहे.

या समितीचे नाव Pandemic Preparedness and Emergency Response असे असणार आहे. जर उद्या एखादी महामारी आली तर 100 दिवसांत त्यावर प्रभावी उपाय करू ही महामारी संपवण्यासाही ही समिती काम करेल. ही समिती चार सदस्यांची असणार आहे. कोरोनो महामारीनंतर अशीच एखादी महामारी आल्यास काय करावे लागेल यासाठी ही समिती नेमली जाईल.

महामारी आल्यानंतर पहिले 100 दिवस महत्त्वाचे असतात. त्यासाठी या 100 दिवसांत काय उपाययोजना केल्या पाहिजते, काय रणनीती ठरवली पाहिजे त्यासाठी ही समिती कार्य करेल. जून 2023 साली स्थापित झालेल्या समितीने कोरोना महामारी आणि इतर सार्वजनिक संकटांच्या अनुभवांवर आणि आव्हानांवर आधारित काही सूचना केल्या आहेत. कोरोना महामारी हे शेवटचे संकट नव्हते असे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे Pandemic Preparedness and Emergency Response समिती गठित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.