‘सोशल मीडिया’चा वापर करताना सतर्कता बाळगा! पैठणच्या शांतता समितीच्या बैठकीत पोलिसांचे आवाहन

‘पैठण ही संतांची भूमी आहे. येथूनच जगाला शांतता ग सहिष्णुतेचा संदेश दिला गेला. त्यामुळे आगामी सण उत्सवाला गालबोट लागणार नाही. यासाठी पोलीस तर सज्ज आहेतच. मात्र नागरिक, सर्वस्तरातील सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि खासकरून सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या युवावर्गाची मोठी जबाबदारी आहे. याचे भान ठेवून सण साजरे करावेत,’ असा सल्ला पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिला.

बोलत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी पैठणच्या शांतता समितीच्या बैठकीत पोलिसांचे आवाहन डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या या बैठकीत प्रारंभी सहायक पोलीस निरीक्षक गोरे यांनी प्रास्ताविक केले.

३० व ३१ मार्च रोजी अनुक्रमे गुढिपाडवा आणि रमजान ईद साजरी होणार आहे. तर दि १४ फेब्रुवारी रोजी भारतरत्न डॉ. बाळासाहेब आंबेडकर जयंती उत्सव आहे. या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीत सोशल मीडियावर विशेष चर्चा झाली. व्हॉट्स अप, फेसबूक व इन्स्टाग्रामचा जपून वापर करा. संवेदनशील, भडकाऊ, दोन समाजात तेढ निर्माण होईल किंवा धार्मिक भावना दुखावतील अशा पोस्ट करु नका. कोणी करत असेल तर सतर्कता बाळगा. पोलिसांना माहिती द्या. विशेषतः १४ ते २५ पर्यंत वय असलेले युवक यात सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. त्यांचे सुज्ञ नागरिक म्हणून प्रबोधन करा. चुकीच्या कामापासून परावृत्त करा. अन्यथा कारवाईचा बडगा उचलावा लागेल. असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

लोकप्रतिनिधींची बैठकीकडे पाठ या बैठकीस व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष पवन लोहिया, बलराम लोळगे, गौतम बनकर व काझी कलिमुल्लाह यांचीच उपस्थिती होती. पोलिसांनी दोन दिवस आगोदरच आवाहन करुनही बैठकीस कोणीच आले नाही. शहरात ९ माजी नगराध्यक्ष, २१ उपनगराध्यक्ष व शेकडो माजी नगरसेवक आहेत. यापैकी एकही हजर नव्हता. प्रत्यक्ष सण-उत्सवात आमदार खासदार आल्यावर चमकोगिरी करणाऱ्या आजीमाजी लोकप्रतिनिधींनी बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.