गेमिंग आणि ऑटोमोटिव्ह इनोव्हेशन या दोन क्षेत्रांना जोडणाऱ्या ऐतिहासिक सहकार्यात, क्राफ्टॉन इंडिया आणि महिंद्राने महिंद्राची इलेक्ट्रिक एसयुव्ही बीई 6 बॅटलग्राउंडस् मोबाईल इंडिया (बीजीएमआय) गेमिंगच्या रोमांचक विश्वात आणण्यासाठी भागीदारी केली आहे. तंत्रज्ञानप्रेमी भारतीय तरुणांना अत्याधुनिक आणि विस्मयकारक अनुभव देण्याच्या उद्देशाने ही भागीदारी करण्यात आली आहे.
16 जानेवारी 2025 पासून सुरू होत असलेल्या सहकार्याच्या या पर्वामुळे, बॅटलग्राउंडस् मोबाईल इंडिया गेमच्या खेळाडूंना खेळाच्या रोमांचकतेला नवीन उंची देत बीई 6 या स्पोर्टी आणि परफॉर्मन्स ड्रीव्हन एसयुव्हीचा गेममध्ये अनुभव घेता येईल. खेळाडूंना बीई 6 या एसयुव्हीपासून प्रेरित विशेष बक्षिसे अनलॉक करता येतील. यामध्ये Quantum आणि Chrono Charge सूट, Volt Tracer Gun, Neon Drop BE 6 पॅराशूट, Flashvault BE 6 बॅकपॅक, SparkStrike Pan यांचा समावेश असणार आहे. याशिवाय, या सहकार्यादरम्यान खेळाडूंना महिंद्रा इव्हेंट क्रेट्स, गिफ्ट्स, आणि एक खरीखुरी बीई 6 एसयुव्ही जिंकण्याची संधी मिळेल.
बीई 6 एसयुव्ही जिंकण्याची संधी
क्राफ्टॉन आणि महिंद्राच्या सहकार्य पर्वाचे विशेष आकर्षण म्हणजे खेळाडूंना केवळ आभासी जगातच नाही, तर खऱ्याखुऱ्या जगातही एसयुव्ही जिंकण्याची संधी मिळणार आहे. खेळाडूंनी महिंद्रा बीई 6 एक्स्चेंज सेंटर मिशन्स पूर्ण करून Nitro Wheel गोळा करायचे व त्याद्वारे “महिंद्रा इव्हेंट क्रेट” रिडीम करायचे आहे. त्यानंतर, बॅटलग्राउंडस् मोबाईल इंडिया गेममधील बीई 6 एसयुव्ही गाडी दाखवणारा 10–30 सेकंदांचा व्हिडिओ तयार करून Instagram किंवा YouTube वर पोस्ट करायचा आहे. पोस्टमध्ये बॅटलग्राउंडस् मोबाईल इंडिया आणि महिंद्रा इलेक्ट्रिकच्या अधिकृत अकाउंट्सला टॅग करणे व #BGMIxMahindra आणि #UnleashTheCharge हे हॅशटॅग वापरणे गरजेचे आहे. या स्पर्धेद्वारे एका खेळाडूला खरीखुरी बीई 6 एसयुव्ही जिंकण्याची संधी मिळेल. (अटी व शर्ती लागू).