
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झालेल्या बॉर्डर गावसकर करंडकात टीम इंडियाचे प्रदर्शन अत्यंत खराब राहिले होते. परिणामी टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. हा पराभव हिंदुस्थानी चाहत्यांच्या जिव्हारी लागला होता. BCCI ने आता कडक कारवाई करत टीम इंडियाच्या सपोर्टींग स्टाफमध्ये मोठा बदल केला आहे. टीम इंडियाच्या संघातून चार कर्मचाऱ्यांना BCCI ने काढून टाकले आहे.
बॉर्डर गावसकर कंरडकताली टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे BCCI ने कारवाईचा बडगा उभारत फिल्डींग कोच टी दिलीप, स्ट्र्रेंथ आणि कंडिशनिंग कोच सोहम देसाई आणि एका फिजीयोला सुद्धा काढून टाकले आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचा अत्यंत जवळच्या अभिषेक नायरला सुद्धा BCCI ने घरचा आहेर दिला आहे. अभिषेक नायर संघामध्ये सहाय्यक प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडत होता. 24 जुलै 2024 रोजी त्याने कार्यभार स्वीकारला होता. 20 जून 2025 पासून टीम इंडियाची इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात येईल, अशी शक्यता आहे.