महिला संघाला हवाय फिजिओ आणि ट्रेनर

हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघासाठी सध्या एका नवीन फिजिओथेरपिस्ट आणि प्रशिक्षकाचा बीसीसीआय युद्धपातळीवर शोध करतेय. हे प्रशिक्षक पुढील दोन वर्षांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स येथे तैनात असतील. या दोन्ही पदांसाठी बीसीसीआयने अर्ज मागवले असून, लवकरच भरती केली जाणार आहे. नितीन पटेल यांच्यानंतर क्रीडा विज्ञान आणि वैद्यकशास्त्र विभागालाही नवीन प्रमुख मिळणार आहे. तर आकांक्षा सत्यवंशी यांनी फिजिओचे पद, तर आनंद दाते यांनी स्ट्रेंथ अँड पंडिशनिंग प्रशिक्षकाचे पद सोडले तेव्हापासून हे पद रिक्तच आहे. नव्याने भरती होणारे फिजिओ, ट्रेनर हे सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये काम करणार असून, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये संघासोबत दौरा करणार आहेत.