BCCI मध्ये नोकरीची संधी, कुठली आहे जागा आणि कोण करू शकतं अर्ज? वाचा…

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून BCCI चा जगात डंका आहे. याच बीसीसीआयमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. बीसीसीआयने बंगळुरूच्या अत्याधुनिक अशा बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये गोलंदाजी प्रशिक्षक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. फिरकीपटूंसाठी प्रशिक्षकाच्या शोधात बीसीसीसीआय आहे. हा गोलंदाजी प्रशिक्षक सर्व फॉरमॅटमधील आणि वयोगटातील गोलंदाजांच्या कामगिरी आणि विकासासाठी कटिबद्ध असेल.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक हा बीसीसीआय COE च्या क्रिकेट प्रमुखांसोबत काम करणार आहे. त्याचबरोबर सर्व फॉरमॅटमधील म्हणजेच टीम इंडियाचा वरिष्ठ संघ (महिला आणि पुरुष), टीम इंडिया ए, अंडर-13, अंडर-19, अंडर-16 आणि अंडर-15 या वयोगटातील खेळाडूंना प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या विकासासाठी कटीबद्ध राहून त्यांच्या खेळाला प्रोत्सोहान देण्याचे महत्त्वाचे काम प्रशिक्षकावर असणार आहे. या पदासाठी 10 एप्रिल 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज पाठवता येणार आहेत.

IPL 2025 – संघ हरला पण कर्णधाराने इतिहास रचला, एक खास विक्रम केला आपल्या नावावर

या पदासाठी कोण अर्ज करू शकतं?

या पदावर काम करण्यासाठी बीसीसीआयने काही पात्रता निकषांचा समावेश केला आहे. त्यानुसार या पदासाठी अर्ज करणारा व्यक्ती हा, टीम इंडियाचा माजी खेळाडू किंवा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू, ज्याच्याकडे 75 प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव असावा. तसेच आंतरराष्ट्रीय/इंडिया ए/इंडिया अंडर-19/इंडियाचा महिला संघ किंवा आयपीएल संघासोबत मागील सात वर्षांमध्ये किमान तीन वर्ष क्रिकेट प्रशिक्षणाचा अनुभव असावा.