BCCI ची मोठी घोषणा; वर्षाच्या शेवटी दोन दिग्गज संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार, वेळापत्रक जाहीर

BCCI ने प्रसिद्धीपत्रक जारी करत क्रीडा प्रेमींना आनंदाची बातमी दिली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या पुरुष संघाच्या वेळापत्रकाची घोषणा केली असून, वर्षाच्या शेवटी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यामध्ये एकूण 4 कसोटी सामने, 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळले जाणार आहेत. बुधवारी (02 एप्रिल 2025) बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रक जारी करत वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केली आहे.

बीसीसीआयने केलेल्या घोषणेनुसार, वेस्ट इंडिज ऑक्टोबरमध्ये हिंदुस्थान दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यामध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. पहिला कसोटी सामना 2 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये आणि दुसरा कसोटी सामना 10 ऑक्टोबर रोजी कोलकातामध्ये खेळला जाईल. त्याचबरोबर नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ हिंदुस्थान दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका, तीन सामन्यांची वनडे मालिका आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. विशेष म्हणजेच पहिल्यांदाच गुवाहटी येथे कसोटी सामना खेळला जाणार आहे.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी -14 नोव्हेंबर 2025 ते 18 नोव्हेंबर 2025 (नवी दिल्ली)
दुसरी कसोटी – 22 नोव्हेंबर 2025 ते 26 नोव्हेंबर 2025 (गुवाहटी)

वनडे मालिकेचे वेळापत्रक

पहिली वनडे – 30 नोव्हेंबर 2025 (रांची)
दुसरी वनडे – 3 डिसेंबर 2025 (रायपूर)
तिसरी वनडे – 6 डिसेंबर 2025 (वायजॅक)

टी-20 मालिकेचे वेळापत्रक

पहिली टी-20 – 9 डिसेंबर 2025 (कटक)
दुसरी टी-20 – 11 डिसेंबर 2025 (न्यू चंदीगढ)
तिसरी टी-20 – 14 डिसेंबर 2025 (धर्मशाला)
चौथी टी-20 – 17 डिसेंबर 2025 (लखनऊ)
पाचवी टी-20 – 19 डिसेंबर 2025 (अहमदाबाद)