जेवल्यावर त्वरीत अंघोळ केल्याने शरीराला धोका होऊ शकतो. असे केल्याने आपल्या शरीरातील पचनक्रिया संथ गतीने होते आणि शरीराचे तापमान कमी होऊन अस्वस्थ वाटू शकते.
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण वेळेवर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे योग्य वेळी अंघोळ करणे देखील शरीरासाठी फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते प्रत्येकाला अंघोळीची योग्य वेळ माहित असणे आवश्यक आहे. सकाळी शिवाय संध्याकाळी अंघोळ करणे फायद्याचे आहे. विशेषत: उन्हाळा आणि पावसाळ्यात बराच वेळ बाहेर असल्याने त्वचेवर धूळ-माती आणि घामाचा थर बसतो ज्यामुळे बरेच आजार होऊ शकतात.
जेवल्यावर त्वरीत अंघोळ केल्याने काय होतं?
जेवल्यावर अंघोळ केल्याने पचनक्रिया संथ गतीने होते. खरं तर, जेव्हा आपण जेवतो तेव्हा ते जेवण पचन्यासाठी रक्ताभिसरण पोटाच्या चारही बाजूने होत असते. पण त्वरीत अंघोळ केल्याने रक्ताभिसरण संथ गतीने होऊ लागते.
जेवल्यावर त्वरीत अंघोळ करताना आपल्या शरीराचे तापमान कमी होते, ते आपल्या शरीरासाठी हानिकारक होऊ शकते.
जेवल्यावर त्वरीत अंघोळ केल्याने शरीराचे तापमान कमी होऊन अस्वस्थ वाटू शकते. ज्याने छातीमध्ये जळजळ होऊ शकते.
जेवल्यावर त्वरीत अंघोळ केल्याने शरीरात लठ्ठपणा वाढू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही जेवणानंतर अंघोळ करू इच्छिता तर जेवणानंतर एक दोन तासाचे अंतर ठेऊन करू शकता. ज्यामुळे तुमच्या शरीराला कोणताही त्रास होणार नाही. आणि पचनक्रिया चांगली राहील.