आता चॅटजीपीटीवर एआय बार्बी डॉल ट्रेंड

चॅटजीपीटीवर घिब्ली स्टाईल पह्टोच्या ट्रेंडनंतर आता एआय बार्बी ट्रेंड पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा ट्रेंड व्हायरल झाला असून एआयच्या मदतीने अनेक जण आपल्या पह्टोला बार्बी डॉलमध्ये कन्व्हर्ट करत आहेत. इन्स्टाग्राम आणि एक्सवर युजर्स चॅटजीपीटीसारख्या एआयचा टूल्सचा वापर करताना दिसत आहेत. हा पह्टो एआय बार्बी डॉलमध्ये ट्रेंड केल्यानंतर पह्टो एकदम बार्बी डॉलसारखा दिसत आहे. सोशल मीडियावर हॅशटॅग एआय बार्बी अंतर्गत हजारो पह्टो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत आहेत.