अजित पवारांना ‘ते’ वक्तव्य भोवलं, बारामती न्यायालयाने बजावलं समन्स; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

उमुख्यमंत्री अजित पवार यांना एका जुन्या वक्तव्यावरून बारामती न्यायालयाने समन्स बजावलं आहे. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. याबाबत सुरेश खोपडे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी 2014 च्या निवडणुकीत उमेदवाराला मतदान केलं नाही तर गावचं पाणी बंद करु, असं वक्तव्य केलं होतं. याच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर न्यायालयाने त्यांना समन्स बजावलं आहे.

याचिकाकर्ता सुरेख खोपडे हे माझी आयपीएस अधिकारी आहेत. 2014 च्या निवडणुकीत ते आप पक्षाचे उमेदवार होते. त्यावेळी त्यांनी तक्रार बजावली होती. यातच आता बारामती न्यायालयाने त्यांनी समन्स बजावलं. अजित पवार यांना16 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती सुरेश खोपडे यांनी दिली आहे.