उत्तर प्रदेशच्या बाराबाकीमध्ये एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. दोन प्रेयसी असताना एका तरुणाने इंस्टाग्रामवर विदेशी तरुणीशी मैत्री केली. त्यानंतर त्यांचे प्रेमप्रकरण सुरु झाले. तरुणी कॅनडाची होती. तो तिला इंप्रेस करण्यासाठी महागड्या भेटवस्तू देऊ इच्छित होता. मात्र परिस्थिती नसल्याने तो तिला महागड्या भेटवस्तू देऊ शकत नव्हता. अखेर त्याने Dhoom-3 सिनेमाप्रमाणे बॅंक लुटण्याचे प्लॅनिंग केले.
चोरी करण्यासाठी तरुणाने पीएनबी बँकेची निवड केली आणि ती लुटण्यासाठी तो गेला. त्याने बँकेचे टाळे तोडण्याचा बराच प्रयत्न केला मात्र अयशस्वी ठरला. बॅंक लुटण्याचा प्रयत्न झालाय हे समजताच बँकेने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता त्या तरुणाचे कृत्य दिसले. पोलिसांनी त्याचा शोध घेत अवघ्या तीन तासात आरोपी तरुणाला अटक केली आहे.
शाहिद खान उर्फ अब्दुल समद असे त्या आरोपीचे नाव आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी बॅंक लुटण्याचा प्लॅन केला होता. पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात उभे केले असता तुरुंगात पाठवण्यात आले आहे.