यशवंत वर्मा अलाहाबाद हायकोर्टातही नकोच! वकिलांनी घेतली सरन्यायाधीशांची भेट

कॅशकांड फेम दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा अलाहाबाद हायकोर्टात नकोच, अशी मागणी देशभरातील सहा उच्च न्यायालयांतील बार असोसिएशनने आज सरन्यायाधीश संजीव खन्ना यांची भेट घेऊन केली. त्यावर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.