ऑक्टोबरमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या, 15 दिवस बँका राहणार बंद!

ऑक्टोबर महिला सुरू झाला आहे. या महिन्यात देशातील बँका एकूण 17 दिवस कार्यरत राहतील अशी अपेक्षा आहे. ऑक्टोबर हा वर्षाचा 10वा महिना तर आर्थिक वर्षाचा सातवा महिना आहे. देशात सणांचा हंगाम सुरू असल्याने या महिन्यात अनेक सुट्ट्याही येतात. तथापी, महिन्यातील बरेच दिवस, बॅंका बंद राहणार आहेत. यात शनिवार आणि रविवारसह अनेक सुट्ट्यांचा समावेश आहे.

गांधी जयंतीची 2 ऑक्टोबरची सुट्टी, 3 ऑक्टोबरला घटस्थापना होत असल्याने नवरात्रीच्या निमित्ताने बँका बंद राहतील. त्यानंतर रविवार, ६ ऑक्टोबर रोजी बँक बंद राहणार आहे. त्यानंतर, महासप्तमीच्या निमित्ताने गुरुवार 10 ऑक्टोबर रोजी बंका बंद असतील.

बुधवार, १६ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनामुळे बँका बंद राहणार आहेत. महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त शहरांमधील बँका गुरुवार, 17 ऑक्टोबर रोजी बंद राहतील. त्या आठवड्यानंतर रविवार, 20 ऑक्टोबर रोजी बँका बंद राहतील.

त्यानंतर नेहमीप्रमाणे 26 ऑक्टोबर रोजी बँका बंद राहतील, कारण तो महिन्याचा चौथा शनिवार असेल. त्यानंतर रविवार, 27 ऑक्टोबर रोजी बँका बंद असतील. काही शहरांमध्ये गुरुवार, 31 ऑक्टोबर रोजी काली पूजा आणि नरक चतुर्थी निमित्त बँका बंद राहतील.

ऑक्टोबरमधील सणांमुळे बँकांना भरभरुन सुट्ट्याच सुट्ट्या असल्याने बॅंक व्यवहार बंद असतील. परंतू मोबाईल आणि ऑनलाईन बॅंकेचा वापर सुरू राहणार आहे. कॅश विड्रोवल करण्यासाठी एटीएमचा वापर करू शकता.