देशभरातील बँकाकडून कोटय़वधी रुपयांचे कर्ज घेणाऱया बडय़ा धनदांडग्यांना बँकांनी दिलासा देत त्यांचे 12 लाख कोटींचे कर्ज माफ केले. कर्ज बुडवणाऱयांमध्ये बडय़ा उद्योगपतींचा समावेश असून अनिल अंबानी, जिंदाल ते जेपी ग्रुप असे उद्योगपती आहेत. संसदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला सरकारने दिलेल्या उत्तरात ही बाब समोर आली आहे. मागील दहा वर्षांत बँकांनी सुमारे 12 लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत. सरकारी बँकांनी यातील निम्म्याहून अधिक रक्कम माफ केली. एसबीआयने गेल्या पाच वर्षांत जवळपास दीड लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडियाचा क्रमांक लागतो.