अखेर आजोबांना मिळणार 60 लाख, लॉकरमधून सोने गहाळ झाल्याने बँक देणार पैसे

आयकर विभागाने जप्त केलेले सोने बँकेच्या लॉकरमधून गहाळ झाल्याने अखेर त्याचा मोबदला म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिकाला 60 लाख रुपये देणार आहे. तशी माहिती बँकेने उच्च न्यायालयात दिली.

हिरालाल मालू असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. ते पुण्यात राहतात. त्यांच्या घरी 2005 मध्ये आयकर विभागाने धाड टाकत घरातून सुमारे 70 तोळे सोने जप्त केले. हे सोने बँक ऑफ महाराष्ट्रच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आले होते. नंतर हे सोने परत करण्याचा निर्णय आयकर विभागाने घेतला. वारंवार विनंती करूनही मालू यांना सोने मिळाले नाही. अखेर त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले. न्या. एम. एस. सोनक व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने आयकर विभाग व बँकेला प्रत्येकी 35 लाख रुपये कोर्टात जमा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ही रक्कम कोर्टात जमा करण्यात आली आहे.