
बँकेत नोकरी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांच्या 146 पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी शेवटची डेडलाइन 25 एप्रिल 2025 आहे. सिनिअर रिलेशनशीप मॅनेजर 101, टॅरिटरी हेड 17, वेल्थ स्ट्रटेजिस्ट 18, प्रायव्हेट बँकर, 3, ग्रुप हेड 4, डेप्युटी डिफेन्स बँकिंग अॅडव्हायजर 1, प्रोडक्ट हेड 1, पोर्टफोलियो रिसर्च अॅनालिस्ट एक पदांवर भरती केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाणार आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती बँक ऑफ बडोदाची अधिकृत वेबसाईट www.bankofbaroda.in वर देण्यात आली आहे.