
बँक ऑफ बडोदाने विविध विभागांमधील 518 व्यावसायिक रिक्त पदे भरण्यासाठी सुरू असलेल्या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. या भरतीसाठी आधी 11 मार्च ही अखेरची डेडलाईन होती, परंतु बँकेने आता 21 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. बँकेच्या भरतीसंबंधी सविस्तर माहिती बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर देण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान 350 जागा, व्यापार आणि विदेशी मुद्रा 97 जागा, जोखीम व्यवस्थापन 35 जागा व सुरक्षा संबंधीच्या 36 जागा भरल्या जाणार आहेत. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा वेगवेगळी आहे.