बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

बँक ऑफ बडोदामध्ये विशेष अधिकारी पदासाठी अर्ज करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. 1200 हून अधिक पदे भरली जाणार असून उमेदवार 27 जानेवारीपर्यंत www.bankofbaroda.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. बँक ऑफ बडोदाच्या विविध शाखांमध्ये कृषी विपणन अधिकारी, कृषी विपणन व्यवस्थापक, अधिकारी सुरक्षा विश्लेषक, विकासक आणि इतर पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. पदव्युत्तर पदवी, एमबीए/पीजीडीएम, सीए किंवा सीएफए आदी अर्ज करू शकतात.