Bangladesh Protests: बांगलादेशच्या माजी कर्णधाराच्या घराची तोडफोड करून लावली आग

बांगलादेशात आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे हिंसाचार उफाळून आला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांतच 100 हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. राजधानी ढाकामध्ये तब्बल 4 लाख नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी अनेक ठिकाणी तोडफोड जाळपोळ केली. यामध्ये अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. या चकमकीत आंदोलकांनी बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मशरफी मुर्तझा याच्या घराची देखील तोडफोड केली आहे.

बांगलादेशचे माजी क्रिकेटपटू मशरफी मुर्तफा हे या वर्षी सलग दुसऱ्यांदा नरेल-2 मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आला होता. दरम्यान आंदोलकांनी मुर्तझा याच्या घरावर हल्ला केला. आंदोलकांनी मशरफी याच्या घराची तोडफोड केली असून त्यांच्या घराला आग लावल्याची माहिती देखील समोर आली आहे. मशरफीच्या घराला आग लावण्याबरोबरच आंदोलकांनी जिल्ह्यात असलेल्या अवामी लीगच्या कार्यालयालाही आग लावली. बांगलादेशातील ‘ढाका ट्रिब्यून’या दैनिक वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली आहे.


कोण आहे मशरफी मुर्तझा-

मशरफी मुर्तझा हा एक उत्तम क्रिकेटर असून तो बांगलागदेशकडून सलग 20 वर्षे क्रिकेट खेळला आहे. त्याच्या 20 वर्षाच्या या कारकिर्दीत बांगलादेशचे 117 सामन्यांमध्ये नेतृत्व केले. तसेच 36 कसोटी सामने खेळले असून यामध्ये 390 विकेट्स आणि 2,955 धावा केल्या आहेत. याचसोबत मशरफीने 220 एकदिवसीय सामने आणि 54 T20 सामने खेळले आहेत.

दरम्यान, 20 वर्षाच्या कारकिर्दीनंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर, मशरफी मोर्तझाने 2018 मध्ये राजकारणात प्रवेश करून शेख हसीनाच्या अवामी लीगमध्ये प्रवेश केला. यानंतर बांगलादेशातील नराइल-2 मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.