पुणे स्टेशनवर बांगलादेशी घुसखोर तरुणीला पकडले

बांगलादेशी घुसखोर तरुणीला बंडगार्डन पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. संबंधित तरुणीवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुसलमिया अब्दुल अजिज प्यादा (वय 27, रा. बांगलादेश) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचे नाव आहे. मुसलमिया मंगळवारी सायंकाळी पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सहाजवळ असलेल्या रिक्षाथांब्याजवळ थांबली होती. पोलिसांच्या पथकाला संशय आल्याने तिची चौकशी केली असता ती बांगलादेशातून आल्याची माहिती मिळाली. तिच्याकडे पारपत्र, तसेच हिंदुस्थानात प्रवेश करण्याबाबतची अधिकृत कागदपत्रे नसल्याचे उघडकीस आले आहे.