बांगलादेशातील उच्चायुक्तांना समन्स

बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराला विरोध करत आगरतळा येथील बांगलादेश उच्चायुक्तालयाजवळ निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी उच्चायुक्तालयात घुसण्याचा प्रयत्न करत तोडफोड केली. आता या प्रकरणी आज बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने ढाक्यातील हिंदुस्थानी उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना चौकशीसाठी समन्स बजावले. त्यानुसार परराष्ट्र सचिव रियाझ हमीदुल्ला यांची भेट घेण्यासाठी प्रणय वर्मा आज दुपारी 4 वाजता परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले. या वेळी झालेल्या चौकशीनंतर वर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आम्ही बांगलादेशच्या अंतरिम सरकारशी संलग्न कारभार करण्यास तयार आहोत आणि शांतता, सुरक्षा तसेच एकत्र काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत असे ते म्हणाले.