बांगलादेश हिंदुस्थानवर गुरगुरला; चीनच्या विस्तारवादाला मुहम्मद युनूस यांच्याकडून खतपाणी

हिंदुस्थानच्या हस्तक्षेप आणि लष्करी कारवाईमुळे बांगलादेशची निर्मिती झाली. मात्र, बांगलादेशला या इतिहासाचा विसर पडला असून आता ते हिंदुस्थानवरच गुरगुरत आहेत. बांगलादेशचे अंतरिम सरकारचे सल्लागार मुहम्मद युनूस यांनी नुकतीच चीनची भेट घेतली. या भेटीत त्यांनी हिंदुस्थानमधील ईशानेयकडील राज्ये ज्यांना सेव्हन सिस्टर म्हणून ओळखले जाते. या राज्यांची कोंडी करण्याची योजना युनूस यांनी चीनसोबत आखली आहे. तसेच त्यांनी चीनच्या विस्तारवादाला खतपाणी घातले आहे.

ईशान्येकडील ही सात राज्ये भूवेष्टित आहेत. एका बाजूला चीनच्या सीमा आहेत. तर दुसरीकडे बांगलादेशच्या सीमा आहे. हिंदुस्थानला या सात राज्यांशी जोडणारा चिंचोळा भूभाग ज्याला नेक लाईन म्हणून ओळखले जाते. या भागावर कब्जा करण्याचे चीनचे स्वप्न आहे. चीनने याआधी अरुणाचल प्रदेशातील डोकलामवर हक्क सांगितला. त्यानंतर त्यांनी लाडाखमध्येही घुसखोरी केली. हिंदुस्थानच्या या ईशान्येकडील राज्यांचे आम्ही रक्षक आहोत, अशी दर्पोक्तीही त्यांनी केली आहे.

मुहम्मद युनूस यांनी ईशान्येकडील राज्यांना चीनच्या मदतीने गर्भीत इशारा दिला आहे. त्यांनी चीनच्या विस्तारवादाला खतपाणी घालत चीनला या प्रदेशात विस्तार करण्याचे आवाहन केले आहे. नुकत्याच बीजिंगच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर असलेले युनूस यांनी बीजिंगला विस्तार करण्याचे आवाहन केले. चीनने बांगलादेशमध्ये तळ स्थापन करून आणि हिंदुस्थानच्या ईशान्येकडील राज्यांत विस्तार करण्याचे आवाहन केले. त्यांचे हे आवाहन हास्यास्पद असल्याचे संरक्षण विश्लेषकांनी म्हटले आहे.

हिंदुस्थानचा हा भाग भूवेष्टीत असल्याने चीनसाठी मोठी संधी आहे. त्याचा चीनच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल. बांगलादेशी नेत्याच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करून, पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सान्याल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ शेअर केला. त्यात सान्याल यांनी म्हटले आहे की, ईशान्येकडील 7 राज्ये भूवेष्टित आहेत या आधारावर युनूस चिनी लोकांना सार्वजनिक आवाहन करत आहेत हे मनोरंजक आहे. बांगलादेशमध्ये गुंतवणूक करण्यास चीनचे स्वागत आहे. मात्र, त्यांनी हिंदुस्थानला गर्भीत इशारा देणे हास्यास्पद आहे, असे ते म्हणाले.