वांद्रे पूर्व येथे जनमताचा कौल शिवसेनेला

विकासकामे, पुनर्विकासाची रखडपट्टी या मुख्य समस्या कायम असतानाच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाचे झिशान सिद्दिकी तसेच मनसेच्या तृप्ती सावंत या दलबदलू उमेदवारांबद्दल नाराजी निर्माण झाली होती तर लोकांचे मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्यात शिवसेना यशस्वी ठरली. त्यामुळे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना-महाविकास आघडी आघाडीचे उमेवार करुण सरदेसाई यांनाच जनमताचा कौल मिळाला.

वांद्रे पूर्व मतदारसंघात सुरुवातीपासून शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे. या मतदारसंघात शिवसेना-महाविकास आघडी आघाडीच्यावतीने उच्चशिक्षित अशा वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली. गेल्या 14 वर्षांपासून युवासेनेच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय असल्यामुळे त्यांनी शिवसैनिक, कार्यकर्ते यांच्यासह निकडणूक प्रचाराची मोर्चेबांधणी केली. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या करुण सरदेसाई यांनी घरोघरी प्रचार केला. सभा तसेच प्रचारफेऱ्या काढून मतदारसंघातील पुनर्विकास, पाणीपुरकठा, प्रदूषण, वाहतूककोंडीचे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवले. त्यामुळे मतदानाच्या दिवशी लोकांनीही एकगठ्ठा मते त्यांच्या पारडय़ात टाकली. मतमोजणीच्या काही फेऱ्यांमध्ये झिशान सिद्दिकी यांनी त्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न फोल ठरला आणि सरदेसाई निवडून आले.