
बंधन लाइफ इन्श्युरन्स या हिंदुस्थानातील आघाडीच्या जीवन विमा कंपनीने बंधन लाइफ गॅरंटीड इनकम योजना सुरू केली आहे. ही योजना आता बंधन बँकेच्या देशभरातील शाखांमध्ये उपलब्ध होणार आहे. ही नाविन्यपूर्ण योजना पॉलिसीधारकांनापहिल्याच महिन्यापासून जीवन विमा संरक्षणासह आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टय़े या दोन्हींसाठी चांगला पर्याय ठरणार आहे.
बंधन लाइफ इन्श्युरन्समध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आर्थिक सुरक्षा देऊन त्यांना आत्मविश्वासाने वावरता यावे यासाठी वचनबद्ध आहोत असे बंधन लाइफ इन्श्युरन्सचे एमडी आणि सीईओ सतीश्वर बी यांनी दिली. या योजनेद्वारे मुलांच्या शिक्षणासाठी निधी देणे, सेवानिवृत्ती सुरक्षित ककरणे किंवा जीवनातील महत्काची उद्दिष्टय़े साध्य करणे यांसारख्या विविध गरजा पूर्ण करता येणार आहेत. ग्राहक त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी नियमित उत्पन्न पेआऊट किंवा मॅच्युरिटीवर आधारित एकरकमी पेमेंटचा पर्याय निवडू शकतात.