
बांबू सॉल्ट हे जगभरात कोरियन मीठ म्हणून प्रसिद्ध आहे. आरोग्यासाठी पौष्टिक असलेल्या या मिठात पोषक तत्त्वे असतात. उत्तराखंडच्या वन विभागाच्या बांबू आणि फायबर विकास बोर्ड, जायका यांनी संयुक्तपणे मिळून बांबू सॉल्ट तयार केलेय. हे मीठ सर्वात महाग मीठ असून वन विभागाने याचा अभ्यास सुरू करून लवकरच याला तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
एक किलो बांबू मीठ तयार करण्यासाठी 20 दिवसांहून अधिक वेळ लागतो. बांबूच्या आत तयार झाल्याने यात बांबूची पोषक तत्त्वे आढळतात. कोरियन मिठात अनेक प्रकारची मिनरल्स आढळतात. उत्तराखंडमध्ये आतापर्यंत सहा वेळा चाचणी घेण्यात आली असून अजून तीन वेळा याची चाचणी घेतली जाईल. यानंतर हे मीठ तयार केले जाईल. या मिठाची किंमत एक किलो मिठासाठी 20 ते 30 हजार रुपये आहे.