Balod Accident: छत्तीसगडमध्ये ट्रक-कारचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू 7 जण गंभीर

छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यात ट्रक आणि कारची जबरदस्त धडक बसून एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्य झाला असून 7 जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात सोमवारी सकाळी डोंडी येथील भानुप्रतापपूर दल्लीराजहरा मार्गावरील चौरापावड जवळ झाला आहे.

छत्तीसगडच्या बालोद येथे एका भरधाव ट्रकने एसयूव्हीला जबरदस्त धडक दिली. ज्यामध्ये सहा लोकांचा जागीच मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत. जखमींना राजनांदहाव मेडिकल कॉलेजला नेण्यात आले आहे. तर या घटनेनंतर आरोपी ट्रकचालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधिक्षख एएसपी अशोक जोशी यांनी दिली.