
पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बलुच बंडखोरांनी पाकिस्तानच्या सुरक्षा दलावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात चार पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गरीबाबाद भागात हा हल्ला झाला. काही पोलीस कर्मचारी या भागात गस्त घाल होते. तेव्हा बलुच बंडखोरांनी या पोलिसांवर गोळीबार केला. हल्ला केल्यानंतर बंडखोर पळून गेले.
बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच मरण पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांबद्दल दुःख व्यक्त केले आहे. बलुचिस्तानच्या शांततेत विकासात बाधा आणण्यासाठी असे प्रयत्न सफल होणार नाही असेही बुगती म्हणाले. तसेच या हल्ल्यातील आरोपांनी शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असेही बुगती यांनी सांगितले.
नोशकी भागात बलोच बंडखोरांनी सतत हल्ले केले आहेत. या पूर्वी बलुच बंडखोरांनी पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला केला होता. बलुच बंडखोरांनी पाकिस्तान सैनिकांची बसवर बॉम्बस्फोट केला होता. यात 90 सैनिक मृत पावल्याचा दावा बलोच बंडखोरांनी केला होता. पण पाकिस्तानच्या सैन्यअधिकाऱ्यांनी सात सैनिक मृत पावल्याचे म्हटले होते.