भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून राज्यात सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने शेतकरी, महिला, बेरोजगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. महागाई गगनाला भिडली आहे, अशा या भ्रष्ट सरकारला सत्तेवरून पायउतार करा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले, फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ आज सोमवारी मुकुंदवाडी येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी थोरात बोलत होते. याप्रसंगी शिवसेना नेते, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कुणाल चौधरी, पी. सी. शर्मा, जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे, प्रा. मोहन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
थोरात पुढे म्हणाले, आम्ही विकासाची पंचसुत्री घेऊन आलो आहोत. जो शब्द दिला तो आम्ही पाळणार आहोत. म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मताधिक्य देऊन विजय करावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी बोलताना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारच्या लबाड कारभारावर आसूड ओढले. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस खोट बोलत आहेत. शहरात तीन महिन्यात मुबलक पाणी देणार, असे आश्वासन देऊन मोकळे झाले आहेत. आज नवीन पाणी पुरवठा योजनेचे कामच पूर्ण झालेले नाही. असे असताना ते पाणी कसे देणार, असा प्रश्न उपस्थित केला. 1680 कोटींची पाणी पुरवठा योजना तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंजूर केली असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांचेही भाषण झाले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. फुलंब्रीचे उमेदवार विलास महाराष्ट्राची निवडणूक.. आगामी काळातील राजकारणाची नांदी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीकडे अख्ख्या देशाचे लक्ष लागून राहिले. ही निवडणूक केवळ आमदार निवडण्यासाठी नसून आगामी काळातील राजकारणाची नांदी ठरणार आहे, याचा विचार करून मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा समाचार घेतला. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, अशा घोषणा ऐवजी त्यांनी ‘पढ़ेंगे तो बढ़ेंगे’ अशी घोषणा द्यायला हवी, असेही ते म्हणाले.
औताडे, पूर्वचे लहू शेवाळे यांनी जनसेवेसाठी संधी द्यावी, असे आवाहन मतदारांना केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सरचिटणीस मोतीलाल जगताप, तालुका प्रमुख शंकरराव ठोंबरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जगन्नाथ काळे, दलित पँथर्सच्या सूर्यकांता गाडेकर यांचे भाषण झाले. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब डांगे, प्रा. मोहन देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, माजी नगरसेवक कमलाकर जगताप, भाऊसाहेब जगताप, शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, नानासाहेब पळसकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष युसूफ शेख, इब्राहिम पठाण, अनिल पारखे, सुरेंद्र साळुंके, लक्ष्मण पिवळ, सुरेखा गाडे, बबन जगताप, दीपाली मिसाळ, दुर्गा भाटी, प्रशांत जगताप आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन अशोक डोळस यांनी केले. शेवटी युवा सेनेचे जिल्हा अधिकारी हनुमान शिंदे यांनी आभार मानले.