बलात्काराच्या प्रकरणात 16 महिन्यांनी जामीन

विवाहित महिलेला जबरदस्तीने पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या तरुणाची 16 महिन्यांनंतर जामिनावर मुक्तता झाली.

ही घटना दिवसाढवळय़ा घडली होती. तसेच महिलेने कोणतीही आरडाओरड केलेली नाही. तरुणाविरोधात खोटा आरोप केला आहे, असा युक्तिवाद ‘दर्द से हमदर्द’ संस्थेचे अॅड. स्वप्निल कदम आणि अॅड. वेदिका दळवी यांनी केला. तो युक्तिवाद ग्राह्य धरत दिंडोशी सत्र न्यायालयाने तरुणाला जामीन मंजूर केला. 21 वर्षीय तरुणाने तक्रारदार विवाहित महिलेला स्वत:च्या घरापासून जबरदस्तीने पळवून नेले आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.