बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर; चारधाम यात्रेलाही होणार सुरुवात

badrinath-1

जगप्रसिद्ध बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे प्रचंड थंडीमुळे बंद करण्यात येतात. तसेच हे मंगिर दर्शनासाठी पुन्हा कधी उघडणार याची भाविकांमध्ये उत्सुकता असते. बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडल्यानंतर पवित्र मानली जाणारी चारधान यात्राही सुरू होते. आता वसंती पंचमीच्या शुभ मुहूर्तावर बद्रीनाथ मंदिर उघडण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

वसंत पंचमीला टिहरी राज दरबार नरेंद्रनगर येथे होणाऱ्या गणेश पूजेसह जगप्रसिद्ध बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पंचागाच्या गणनेनुसार शुभ मुहूर्तानुसार 4 मे रोजी सकाळी 6 वाजता विधिवत पूजा करून मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात येणार आहेत. भगवान बद्री विशाल यांच्या महाभिषेकासाठी तिळाचे तेल घाण्यातून तयार करण्याचा विधी ले जातील. 22 एप्रिलपासून सुरू होणार आहे. राज दरबार येथून तेल कलश यात्रा सुरू होईल. यासोबतच चारधाम यात्रा देखील औपचारिकरित्या सुररवात होईल.

नरेंद्र नगर येथील राजदरबारात वसंत पंचमीनिमित्त, गणेश, पंचांग आणि चौकीची पूजा केल्यानंतर आचार्य कृष्ण प्रसाद उनियाल यांनी ग्रहांची स्थिती पाहून आणि पंचागीय गणना केल्यानंतर भगवान श्री बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर केली. महाभिषेकासाठी तिळाचे तेल काढल्यानंतर तेल कलश यात्रा सुरू होणार आहे. तसेच चारधान यात्रेचीही सुरुवात होणार आहे. ऋषिकेश, श्रीनगर, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग, डिम्मर गाव आणि पांडुकेश्वर यासारख्या ठिकाणी मुक्काम केल्यानंतर ही यात्रा 3 मे रोजी बद्रीनाथ धामला पोहोचेल. 4 मे रोजी भगवान बद्री विशाल यांचा तिळाच्या तेलाने महाभिषेक केल्यानंतर मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जाणार आहेत.