4 मे रोजी बद्रीनाथचे दरवाजे उघडणार

badrinath-1

उत्तराखंडमधील चामोली जिह्यातील जगप्रसिद्ध बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे 4 मे रोजी सकाळी सहा वाजता उघडण्यात येणार आहेत. वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर बद्रीनाथ मंदिर उघडण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पंचांगाच्या गणनेनुसार शुभमुहूर्तानुसार विधिवत पूजा करून मंदिर भाविकांसाठी खुले केले जाईल. प्रचंड थंडीमुळे मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडल्यानंतर पवित्र मानली जाणारी चारधाम यात्रा सुरू होते. तसेच भगवान बद्रीविशालाच्या अभिषेकासाठी 22 एप्रिल रोजी नरेंद्र नगर येथील राजमहल येथे तिळाचे तेल काढण्यात येणार आहे. बद्रीनाथ मंदिराची दारे उघडल्यानंतर चारधाम यात्रा औपचारिकरीत्या सुरू होईल. दरम्यान, 17 नोव्हेंबर 2024 रोजी थंडीमुळे मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले होते. गतवर्षी 11 लाखांहून अधिक भाविकांनी बद्रीनाथला भेट दिली होती.