गोरेगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन (एमबीए) आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ मुंबई उपनगरच्या (बीएएमयू) संयुक्त विद्यमाने नंदू नाटेकर स्मृती सीनियर आंतरजिल्हा (सांघिक) आणि राज्य बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन येत्या 29 सप्टेंबरपासून गोरेगाव स्पोर्ट्स क्लबवर रंगणार आहे.
तब्बल एका दशकानंतर अधिकृत सीनियर राज्य स्पर्धा गोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये आयोजित केली जाणार आहे. ‘महाराष्ट्र राज्याच्या शटलर्ससाठी सर्वोत्पृष्ट क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याची संधी मिळाल्याचा मला विशेष आनंद वाटतो,’ असे इव्हेंट प्रमुख आणि शटलव्रेझचे संचालक डॉ. आर्लेन घोष यांनी म्हटले आहे.
‘या स्पर्धेद्वारे मुंबईतील प्रेक्षकांना काही रोमांचक आणि चुरशीचे सामने पाहायला मिळतील. याशिवाय या स्पर्धेद्वारे आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या राज्य संघासाठी राज्यातील युवा आणि अव्वल मानांकित खेळाडू पुढे येतील,’ असे ते पुढे म्हणाले.
नंदू नाटेकर स्मृती सीनियर आंतर जिल्हा (सांघिक) आणि राज्य बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी आणि दुहेरी, महिला एकेरी आणि दुहेरी तसेच मिश्र दुहेरी या पाच कॅटेगरीचा समावेश असेल.