
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची न्यायालयाने 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. अक्षय शिंदे याची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. महिला न्यायाधीश व्ही ए पत्रावळे यांनी हे आदेश दिले आहेत.
अक्षय शिंदे याला आज कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी पीडितेची बाजू मांडली. विशेष महिला न्यायाधीश व्ही.ए.पत्रावळे यांच्या कोर्टात अक्षय शिंदे याला हजर करण्यात आलं.