
बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात बदलापूर रेल्वे स्थानकात गेल्या सहा तासांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलक संतप्त झाले असून आरोपीला फाशी द्या अशी मागणी करत आहेत. तसेच जोपर्यंत यावर निर्णय होत नाही तोपर्यंत रेल्वे ट्रॅकवरून हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. दरम्यान राज्यातील मंत्री गिरीश महाजन हे तासाभरापूर्वी बदलापूर स्थानकात पोहोचले असून ते आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आंदोलकांनी आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी कणखर भूमिका घेतली आहे. त्यामुळे गेल्या तासाभरापासून गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्थानकात उभे आहेत.
बदलापूर रेल्वे स्थानकातील आंदोलन चिघळले, आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक#badlapur pic.twitter.com/l9ZDpmMCKW
— Saamana (@SaamanaOnline) August 20, 2024
तुमचे पैसे नको, योजना नको, लाडक्या बहिणीच्या लेकीला न्याय द्या! संतप्त महिलांनी सरकारला फटकारले