तुमचे पैसे नको, योजना नको, लाडक्या बहिणीच्या लेकीला न्याय द्या! संतप्त महिलांनी सरकारला फटकारले

बदलापूर शहरातील आदर्श शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्यानंतरही पोलिसांकडून आरोपी आणि शाळेला पाठीशी घातले जात असल्याच्या निषेधार्थ बदलापूरकर रस्त्यावर उतरले आहेत. बदलापुरात कडकडीत बंद आहे. रेल्वे वाहतूक 10 वाजल्यापासून आंदोलकांनी रोखून धरली आहे.

या वेळी पालकांनी वृत्तवाहिन्यांवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘दहीहंडी नको, सेलिब्रिटी नको आम्हाला न्याय हवा आहे. एकही राजकीय नेता इथे आला नाही. तुम्ही आम्हाला लाडकी बहीण म्हणतात मग तुमच्या बहिणीच्या मुलीला न्याय द्यायला का येत नाहीत. कुठे आहात तुम्ही? आम्हाला तुमचे पैसे नको. तुमच्या दीड हजाराने काही होणार नाही. आमच्या लेकरा्ंना न्याय द्या. प्रशासनाच्या भरवशावर आम्ही लेकरं सोडतो आणि काम करतो आणि जर लेकरं सुरक्षित नसतील तर काय उपयोग. आम्हाला तुमच्या योजना नको, न्याय द्या’, अशी मागणी संतप्त आंदोलक महिला पालकांनी केली.

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रणरागिणींनी सोमवारी आक्रोश मोर्चा का प्रशासनाचे काढले. यानंतर शासनाला खडबडून जाग आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली, तर शाळेने मुख्याध्यापिकेचे निलंबन करून वर्गशिक्षिका आणि आयाला नोकरीवरून काढून टाकले.

12 ऑगस्ट रोजी शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने दोन चिमुकलींवर अत्याचार केले. मुलींच्या पालकांनी तक्रार करूनही 11 तासानंतर या नराधमाला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी शाळा आणि पोलिसांकडून पालकांवर बदलापुरात संताप व्यक्त झाला. दबाव टाकला जात असल्याने शिवसेनेसह व्यापारी असोसिएशन, रिक्षा संघटना यासह विविध संस्थांनी हाक दिली आहे.