लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सायंकाळी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीत दाखल झाले.
भगवती अम्मन मंदिरात पूजाअर्चा करून स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल येथे उभारण्यात आलेल्या ध्यान मंडपम येथे त्यांनी ध्यानधारणेला सुरुवात केली.
स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पंतप्रधान मोदी यांनी सूर्याला जल अर्पण करून ध्यानधारणेस सुरुवात केली.
1 जूनपर्यंत म्हणजेच तब्बल 45 तास ते ध्यानधारणा करणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी कन्याकुमारीत तब्बल दोन हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या दिमतीला खासगी बोटीही असणार आहेत.
जोपर्यंत मोदी स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल येथे थांबतील तोपर्यंत त्यांच्या ध्यानधारणेत कुणी व्यत्यय आणू नये यासाठी पर्यटकांनाही बंदी असणार आहे.
आजपासून शनिवारपर्यंत समुद्रकिनारी पर्यटक आणि खासगी बोटींना फेरी मारण्याची परवानगी नसेल. मुळे कन्याकुमारीत वीकेण्ड घालवण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.