दिव्यांगांच्या कल्याणासाठी मागील सरकारच्या काळात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन केले गेले. परंतु त्याला ना मंत्री ना सचिव. पदभरती सोडाच, दिव्यांगांना मानधनही वेळेवर मिळत नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांना एक पत्रही देत दिव्यांग मंत्रालयाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.