
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या अद्भूत यश मिळाले. राज्यातील 48 पैकी 31 जागांवर महाविकास आघाडीची विजय पताका फडकली. विधानसभा निवडणुकीमध्येही हाच कल राहण्याची शक्यता अनेक सर्व्हेंमधून स्पष्ट झाले. त्यामुळे सत्तेचा मोह आणि तपास यंत्रणांच्या कारवाईच्या भीतीने महायुतीत गेलेल्या नेत्यांना घरवापसीचे वेध लागले असून अजित पवार गटातील आणखी एक नेता घरवापसी करणार आहे.
अजित पवार गटातील माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. शनिवारी दुपारही दोन वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे. Babajani Durrani यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
बाबाजानी दुर्रानी विधान परिषदेवर आमदार होते. गेल्या महिन्यात त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. ते गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटामध्ये अस्वस्थ होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी त्यांचा संपर्कही सुरू होता. अखेर बाबाजानी दुर्रानी यांनी घरवापसीचा निर्णय घेतला आणि आज दुपारी 2 वाजता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
या घरवापसीच्या निर्णयाबाबत माध्यमांशी बोलताना बाबाजानी दुर्रानी म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात माझा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश होईल. पक्षाकडून मला कोणतेही आश्वासन मिळालेले नसून विचारसरणीच्या आधारावर मी हा निर्णय घेतला आहे.
तडीपार व्यक्ती देशाचे गृहमंत्री, शरद पवार यांचा अमित शहांवर हल्ला
संपूर्ण देशात मुसलमानांची कुटुंबना होत आहे. भाजपसोबत असलेल्या पक्षांना मुसलमान मतदार मतदान करण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत एखाद्या पक्षासोबत राहणे आणि काम करणे अवघड होऊन जाते. त्यामुळे मी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीआधीही अजित पवार गटातील आमदार निलेश लंके यांनी त्यांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वाट पकडली होती. त्यांनी भाजपच्या सुजय विखे-पाटील यांच्याविरोधात नगरमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत लंके यांनी सुजय विखे-पाटलांचा दारूण पराभव केला होता.
महायुतीची उमेदवारी नको; जुनेद दुर्रानी यांनी स्पष्ट केली भूमिका