Smartphone युजर्सचे आयुष्य धोक्यात? बाबा वेन्गाचं भाकित खरं ठरणार!

हल्ली सगळेच मोबाईलच्या स्क्रीनमध्ये मग्न झालेले दिसतात. जणू लोकांनी स्मार्ट फोनला आपला साथीदारच बनवला आहे. दगदगीच्या जीवनात बोलण्यासाठी, मन मोकळं करण्यासाठी कोणती व्यक्ती नसेल तरी चालेल पण मोबाईल मात्र हवाचं. या स्मार्टफोनमुळे लोक एकमेकांपासून दुरावले आहेत. स्मार्टफोनमुळे लोकांना किती नुकसान होत आहे, याचा अंदाज घेण कठीण झालं आहे. या दुष्परिणामांवर प्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबा वेंन्गा यांनी केलेली एक भविष्यवाणी लोकांना विचार करायला लावणारी आहे. भविष्यात मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे काय काय होऊ शकते यांचा इशारा त्यांनी दिला आहे.

भविष्यवेत्ता बाबा वेन्गा यांनी स्मार्टफोनमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर भाष्य केलं आहे. जर एखादी व्यक्ती मोबाईल फोनचा जास्त वापर करत राहिली तर त्याचा परिणाम केवळ शारीरिकच नाही तर भावनिकही होईल. तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे मानव परस्पर संबंधांचे महत्त्व विसरेल असाही त्यांचा इशारा त्यांनी व्यक्त केला आहे. स्मार्टफोनचे व्यसन आपल्याला इतके जखडून टाकेल की आपण भावना आणि वास्तविक जीवनापासून खूप दूर जाऊ. लोक रोबोटसारखे होतील, यंत्रांशी चिकटून राहतील. यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे, असा इशारा त्यांनी दिला.

आजच्या धावपळीच्या जीवनात, स्मार्टफोन लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, परंतु बरेच लोक आता त्यांचा स्क्रीन टाइम नियंत्रित करू शकत नाहीत. स्मार्टफोनचे व्यसन विशेषतः तरुणांमध्ये, झोप, ताण आणि एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर लक्षणीय परिणाम करत आहे, असे संशोधनातून दिसून आले आहे. सोशल मीडियाचे आकर्षण लोकांना वास्तवापासून दूर नेत आहे. यामुळे लोकांमधील संवाद कमी होत आहेत आणि मानसिक समस्या वाढत आहेत.

मोबाईलचा अतिरेकी वापर चिंता, नैराश्य आणि एकाकीपणा यासारख्या मानसिक समस्या निर्माण करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मोबाईल फोनमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे लोकांच्या झोपेवरही खूप परिणाम होत आहे आणि सोशल मीडियावर दिसणारे दिखाऊ जीवन देखील माणसाच्या मनावर परिणाम करते. बाबा वेन्गाची ही भविष्यवाणी आपल्याला विचार करायला लावणारी आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचे आहे.

टाईमपास! 1.1 लाख कोटी तास घालवले मोबाईलवर