अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. बाबा सिद्दीकी वांद्रे पूर्वचे 15 वर्ष आमदार होते. राजकारणी असले तरी बाबा सिद्दीकी यांचे बॉलिवूडमध्येही मित्र होते.