बाबा सिद्दिकीच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी मकोका न्यायालयात 4500 पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटांशी संबंध होते म्हणूनच त्यांना संपवण्यात आल्याचा कबुलीजबाब आरोपींनी नोंदवला आहे.
बाबा सिद्दिकी यांची काही महिन्यांपूर्वी वांद्रे येथे लॉरेन्स बिष्णोई टोळीने हत्या केली होती. या हत्या प्रकरणात 26 जणांना अटक करण्यात आली असून शुभम लोणकर, यासीन अख्तर आणि अनमोल बिष्णोई हे आरोपी पोलिसांना अद्याप सापडलेले नाहीत. तपास करणाऱया गुन्हे शाखेच्या पथकाने मकोका कोर्टात याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले त्या आरोपपत्रातून खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई याने बाबा सिद्दिकाRच्या हत्येची सुपारी दिली होती, बाबा सिद्दिकाRचा दाऊद इब्राहिमशी आणि 1993 च्या बॉम्ब स्फोट घटनेशी संबंध असल्याची माहिती हल्लेखोरांना देण्यात आली होती. एवढेच नव्हे तर बाबा सिद्दिकी किंवा झिशान सिद्दिकी यांपैकी एकाची हत्या करण्यास सांगण्यात आले होते त्याबदल्यात 10 ते 15 लाख रुपये प्रत्येकाला मिळणार होते, अशी माहिती शिवकुमार गौतम या आरोपीने जबाबात नोंदवली आहे. तसेच लॉरेन्स बिष्णोईशी स्नॅपचॅटच्या माध्यमातून संवाद झाल्याचे आरोपींनी कबुलीजबाबात म्हटले आहे.
बाबा सिद्दिकीविरोधात पोलिसात तक्रारी
पोलिसांनी बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. यामध्ये झिशान यांनी वांद्रय़ातल्या 10 बांधकाम व्यावसायिकांचा आणि दोन नेत्यांचा उल्लेख केला आहे. झिशान यांनी या 12 जणांवर कोणताही विशिष्ट आरोप केला नसला तरी या लोकांनी बाबा सिद्दिकाRविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल केल्या, त्यांच्यावर वाईट पद्धतीने टीका केल्याचे म्हटले आहे.
कंबोजचे नाव डायरीत
विकासकांसोबत भाजपचे मोहित कंबोज याचेदेखील नाव असून हत्येच्या दिवशी बाबा सिद्दिकी यांचे व्हॉट्सअॅपवर संभाषण झाले होते अशी माहिती झिशान सिद्दिकी यांनी पोलिसांना दिली आहे. इतकेच नव्हे तर बाबा सिद्दिकी यांना डायरी लिहिण्याची सवय होती. त्या डायरीत त्यांनी मोहित कंबोजचे नाव लिहिले होते, मात्र ते नाव त्यांनी का लिहिले हे आपल्याला माहीत नसल्याचे झिशान सिद्दिकी यांनी जबाबात नोंदवले.
n या आरोपपत्रात झिशान सिद्दिकी यांचादेखील जबाब नोंदवण्यात आला असून हत्येआधी भाजपचे मोहित कंबोज यांच्याशी बाबा सिद्दिकी यांचे संभाषण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अनिल परब यांनी आरोप फेटाळले
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी दाखल आरोपपत्रावर त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांचे समाधान झाले नसेल तर त्यांनी सरकारकडे तशी तक्रार करावी आणि पोलिसांनी पुन्हा चौकशी करावी. सरकार त्यांचेच आहे, असे सांगत शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी झिशान सिद्दिकी यांचे आरोप फेटाळले आहेत. वांद्रे पूर्वमधील ज्ञानेश्वर नगर एसआरए बैठकीला सर्वच पक्षांचे पदाधिकारी होते, असे त्यांनी नमूद केले.
अदानींनाही चौकशीला बोलवा
झिशान यांनी बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात 11 बिल्डर्सवर संशय व्यक्त केला आहे. त्या सर्वांची चौकशी व्हावी. त्यात अदानींचेही नाव असल्याचे सांगितले जाते. मग अदानींनाही चौकशीसाठी बोलवावे असे अनिल परब म्हणाले. बाबूलाल वर्मा, शिवालिक व्हेंचर, पृथ्वी चव्हाण या बिल्डरांची नावे झिशान यांनी घेतली आहेत. तर या सर्वांना बोलवून पोलिसांनी तपास करावा, असे मत अनिल परब यांनी व्यक्त केले.