माजी आमदार आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी मंगळवारी मुंबईतील मोक्का कोर्टमध्ये सुनावणी पार पडली. कोर्टाने मुख्य आरोपी गौतमसह 8 आरोपींना 7 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील 26 आरोपींना पोलिसांनी देशाच्या कानाकोपऱ्यातून ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपींना यापूर्वी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने न्यायलयीन कोठडी सुनावली होती. परंतु 30 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी या सर्व आरोपींविरुद्ध मोक्काच्या तरतुदी लागू केल्या होत्या. त्यानंतर सर्व आरोपींना मंगळवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी मुख्य आरोपी गौतमसह 8 आरोपींची पोलीस कोठडी मागितली होती.